पुणे : राज्यात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी; तसेच खंडित वृष्टी होईल, असा अंदाज कृषी-हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. कमाल तापमान, सकाळ, दुपारची सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी माहितीच्या विविध पंधरा प्रारूपांद्वारे विश्लेषण करून हा अंदाज मांडण्यात आला असल्याचे डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले,की यंदा मोसमी पाऊस उशिराने म्हणजे दहा जून रोजी राज्यात दाखल होईल. त्यानंतरही सलग पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. जूनपासून सप्टेंबपर्यंत सलग पाऊस पडण्याची शक्यता कमी असून, राज्यभरात खंडित वृष्टी होण्याची शक्यता आहे. धुळे,
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.