पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला

पुणे : आपल्या देशाला, महाराष्ट्राला आणि शिवसेनेला लागलेली पनवती २०२४ नंतर शंभर टक्के जाईल.त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता साडेसाती गेली आहे आणि पनवती देखील जाईल.अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील जाहीर मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर,उपनेत्या सुषमा अंधारे,पुणे शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत.

हेही वाचा >>> खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली: म्हणाले, आमदारांना अपात्र न करणारे विधानसभा अध्यक्ष जल्लाद…’

यावेळी संजय राऊत म्हणाले की,नरेंद्र मोदी हे नेहमी गॅरंटी देत असतात.आता ही शिवसेनेची गॅरंटी आहे की, या पुण्यातून शिवसेनेचे किमान तीन आमदार विधानसभेवर जातील.तसेच पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी असल्याच सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

तसेच ते पुढे म्हणाले की,शिल्लक सेना काय आहे ते पाहायचं असेल तर फडणवीस आता या, जर ही शिल्लक सेना असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच गेलाय हे लक्षात घ्या.शिवसेना म्हणजे उसळत महासागर असून त्याला कधीच आहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस सेना कशी मैदानात उतरली आहे ते पाहा,आम्हाला शिल्लक सेना म्हणता २०२४ नंतर तुम्ही शिल्लक राहणार नाहीत.या राज्यात ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणता ती शिवसेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू,अशा शब्दात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा >>> “मिर्चीचं गाजर झालं का?”, प्रफुल्ल पटेलांप्रकरणी संजय राऊत बरसले, म्हणाले, “आपल्या देशाचे पंतप्रधान…”

तसेच ते पुढे म्हणाले की,भ्रष्टाचारांना फासावर लटकावू असे म्हणणार्‍यांनी अजित पवार,हसन मुश्रीफ,प्रफुल पटेल, भावना गवळी, राहुल शेवाळे यांचे काय झाले.ईडी त्यांना अटक करायला गेली होती ना त्यांच काय झालं अशा शब्दात अप्रत्यक्षपणे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टोला लगावला. शिंदे गटातील अनेक नेत्यांचा संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला.त्या भाषणा दरम्यान संजय राऊत म्हणाले की,त्या नीलम ताई नसून विलन ताई आहे.विलन ताईवर जास्त बोलण्याची गरज नसल्याचे म्हणताच उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay raut indirect hit pm narendra modi by using word panauti zws 70 svk