राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची पत्नी आणि आमदार सुमन पाटील यांच्या इनोव्हा गाडीचा टायर फुटून बुधवारी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. मुंबई बेंगलोर महामार्गावर कात्रज देहूरोड बाह्यवळण टप्प्यात वारजे भागात ही घटना घडली. या घटनेत गाडीतील सर्व जण सुखरूप आहेत, अशी माहिती वारजे पोलिसांनी दिली.
या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन पाटील या एमएच 10 बीएम 3758 या इनोव्हा गाडीने मुंबईवरून सांगलीच्या दिशेने जात होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि पुतण्या रोहित आणि रोहन पाटील हे होते. मोहम्मद मोमीन गाडी चालवत होते. त्यांची गाडी वारजे येथील मुठा नदी पुलावर आल्यावर अचानक गाडीच्या उजव्या बाजूचा पुढील आणि मागील टायर फुटला. यामुळे गाडी पुलाच्या उजव्या कठड्यावर जोरदार आदळून घासत पुढे गेली. टायर फुटल्याने भरधाव वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होते. कठडे तोडून दोन पुलांच्या मधील जागेत पडण्यापासून वाचविण्यात चालकाला यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2017 रोजी प्रकाशित
टायर फुटल्याने आमदार सुमन पाटील यांच्या गाडीला अपघात
गाडीतील सर्व जण सुखरूप
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2017 at 00:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patil suman patil road accident