विविध प्रकारची सूप, सार आवर्जून केल्या जाणाऱ्या रेसिपी. आपल्याला टोमॅटोचे सार माहित असते पण चिंचेचे किंवा आमसूलाचे सार काही जणांनाच माहित असते. तोंडाला चव आणणारी, झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट असे हे आमसूल सार आवर्जून प्यायला हवे. सर्दी, कफ झाला असेल तर घशाला आराम मिळावा म्हणून हे गरम सार अतिशय उपयुक्त ठरते. हे सार नेमके कसे करायचे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात पाहुयात.

आमसूल सूप साहित्य

  • १२ आमसूल
  • ५० ग्राम गुळ
  • १ टीस्पून जिरे
  • १५ कढीपत्ता पाने
  • 1टीस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • १०० मिली पाणी
  • १० ग्राम चना दाल पीठ

आमसूल सूप कृती –

स्टेप १

आमसूल स्वच्छ धुवून घ्या

स्टेप २

तूपाची फोडणी करा. त्यात जीरे, हिंग आणि लसूण घाला.

स्टेप ३

फोडणी झाली की त्यात अंदाजे पाणी घाला

स्टेप ४

पाण्यात धुतलेले आमसूल, गूळ, मीठ आणि तिखट आणि किसलेलं किंवा खोवलेले ओलं खोबरं घाला.

स्टेप ५

आमसूलाचा रंग उतरायला सुरुवात होईपर्यंत चांगली उकळी येऊद्या.

स्टेप ६

उकळी आली की गॅस बारीक करा आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

स्टेप ७

हे गरमागरम सार पुलाव, खिचडी, पराठा किंवा अगदी कशासोबतही छान लागते.

हेही वाचा >> गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

अमसूल खाण्याचे फायदे

  • अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी अमसूल खावे.
  • खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे.