माजी IPS शिवदीप लांडे दोन मतदारसंघात पराभूत, महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारनं नाकारलं
बिहारमध्ये पोलीस सेवेत 'सिंघम' म्हणून प्रसिद्धी मिळवलेले माजी आयपीएस शिवदीप लांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीत अपयश आले आहे. त्यांनी अररिया आणि जमालपूर या दोन मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. जमालपूरमध्ये जनता दल (संयुक्त) पक्षाच्या नचिकेत यांनी त्यांचा पराभव केला, तर अररियामध्ये काँग्रेसच्या अबीदूर रहमान यांनी विजय मिळवला.