११ नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! संकट संपेल अन् येतील सुखाचे दिवस
11 November Guru Vakri: वैदिक ज्योतिषानुसार देवतांचे गुरु म्हणजे गुरू ग्रह नवग्रहांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. या ग्रहाची जागा बदलली की त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात दिसतो. सध्या गुरु मिथुन राशीतून जलद गतीने पुढे जात आहेत. साधारणपणे ते एका राशीत एक वर्ष राहतात, पण या वेळी वेग जास्त असल्याने ते कर्क राशीत जाऊन डिसेंबरपर्यंत तिथेच राहतील. त्यामुळे त्यांच्या स्थितीतही बदल होत राहील. गुरु ११ नोव्हेंबरला या राशीत वक्री होणार आहेत.