२७ ऑक्टोबरपासून ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! राजयोग नशिबी आणेल अफाट पैसा, करिअरमध्ये यश
27 October Horoscope Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामध्ये मंगळाचा गोचर खास मानला जातो, कारण मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. लवकरच मंगळ स्वतःच्या म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषानुसार, जेव्हा मंगळ आपल्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा "रुचक राजयोग" तयार होतो, जो पंच महापुरुष योगांपैकी एक शक्तिशाली योग आहे. मंगळाच्या या बदलाचा परिणाम फक्त व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर देश-विदेशावरही होतो.