रविवारी या राशींच्या आयुष्यात नवीन संधी! अपेक्षित प्रेम लाभेल, वाचा आजचे राशिभविष्य
Today Horoscope in Marathi 3 August 2025: आज ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण शुद्ध पक्षातील नवमी तिथी आणि रविवार आहे. नवमी तिथी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. ३ ऑगस्टला पूर्ण दिवस आणि रात्र संपवून ४ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत ब्रह्मयोग राहील. तसेच, पूर्ण दिवस आणि रात्र संपवून ४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील. यानिमित्ताने ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार १२ राशींच्या नशिबी काय घेऊन येणार हे जाणून घेऊया...