९ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींची सोनं अन् चांदी! शुक्राच्या गोचरामुळे संपत्तीत वाढ…
Shukra Gochar on 9 October: ज्योतिषात शुक्राला खूप महत्त्व दिलं जातं. तो प्रेम, आकर्षण, सौंदर्य, कला, ऐशोआराम, विवाह, पैसा आणि सर्जनशीलता यांचा कारक मानला जातो. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींवर चांगला आणि सकारात्मक होईल. शुक्राच्या या गोचरामुळे काही लोकांच्या प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जे लोक अविवाहित आहेत, त्यांना नवीन नातेसंबंध जुळण्याची संधी मिळेल. कामकाज आणि व्यवसायातही चांगले परिणाम दिसतील.