ऑगस्टचे पुढचे २५ दिवस या राशींसाठी ठरतील शुभ! शनीची साडेसाती संपून जीवनात येईल पैसा
August Horoscope: ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी, तीज, गणेश चतुर्थी असे अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये काही महत्त्वाचे ग्रह-गोचर होणार आहेत. हे ग्रह परिवर्तन ५ राशींना मोठा धनलाभ करून देऊ शकतात.
ऑगस्ट महिन्याचा एक आठवडा संपत आला आहे आणि पुढील जवळपास २५ दिवसांत सतत ग्रहांची स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी बुध उदय होईल, त्यानंतर बुध मार्गी होतील.