Budh MangalLabh Yog on 18 August: ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या योगांना खास महत्व दिलं जातं. वैदिक ज्योतिषाच्या गणनेनुसार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी बुध आणि मंगळ यांचा लाभदृष्टि योग तयार होणार आहे, जो अनेक राशींसाठी चांगले परिणाम देईल.
Numerology Predictions: अंकशास्त्रात मूलांक माणसाच्या स्वभाव, विचारसरणी, गुण-दोष आणि जीवनाच्या प्रवासावर परिणाम करतो असे मानले जाते. मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेतील आकड्यांची बेरीज करून मिळणारा अंक.
उदाहरण : जर एखाद्याचा जन्म १५तारखेला झाला असेल, तर १ + ५ = ६ हा त्याचा मूलांक होतो. जर जन्म २४तारखेला असेल, तर २ + ४ = ६ हा मूलांक मिळतो. म्हणजेच ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, त्या तारखेतील आकड्यांची बेरीज करून जो एक अंकी अंक येतो, तो तुमचा मूलांक असतो. आज आपण मूलांक ६ असलेले लोक नेमके कसे असतात ते जाणून घेणार आहोत.
मराठी अभिनेता सुयश टिळकने नंदुरबारमधील मंदिरांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओद्वारे नंदुरबारच्या मंदिरांची माहिती दिली आणि त्याच्या पहिल्या भेटीतील रिक्षावाल्याच्या मदतीने मंदिरं पाहिल्याचं सांगितलं. सुयशने महादेवाच्या मंदिरांमधील सकारात्मक ऊर्जा आणि प्राचीन मंदिरांचा इतिहास याबद्दलही चर्चा केली. त्याने नंदुरबारच्या मंदिरांमधील शांतता आणि भक्तीचा अनुभव शेअर करत महादेवावरच्या श्रद्धेचा उल्लेख केला.
OpenAI चे CEO सॅम अल्टमन यांनी ओपन एआयच्या भविष्यातील सार्वजनिक मालकीबद्दल विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात ओपन एआय सार्वजनिक कंपनी झाल्यास ते CEO पदासाठी योग्य नसतील. ओपन एआय कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. चॅटजीपीटीने मे २०२३ पासून २ बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे, जी स्पर्धक अॅप्सपेक्षा ३० पट अधिक आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय टीव्ही शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकताच या शोचा १७ वा सीझन सुरू झाला असून, अवघ्या सात दिवसांत उत्तराखंडच्या आदित्य कुमार यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. आदित्य आता सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडस करणार आहेत. या शोने २५ वर्षे पूर्ण केली असून, ११ ऑगस्ट २०२५ पासून दररोज रात्री ९ वाजता Sony TV वर प्रसारित होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावली. तिच्या 'परम सुंदरी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती उपस्थित होती. कार्यक्रमातील 'भारत माता की जय' म्हणण्याच्या व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात आलं. जान्हवीने इन्स्टाग्रामवर मूळ व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं. तिने मराठीतून भाषण देत प्रेक्षकांना 'परम सुंदरी' पाहण्याचं आवाहन केलं.
चीनने पाकिस्तानला आठ नवीन प्रगत हँगोर श्रेणीतील पाणबुड्यांपैकी तिसरी पाणबुडी सुपूर्द केली आहे. हिंद महासागरातील आपले वाढते अस्तित्व मजबूत करण्यासाठी इस्लामाबादच्या नौदल क्षमतेत वाढ घडवून आणण्याच्या बीजिंगच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. चीन पाकिस्तानसाठी बांधत असलेल्या आठ पाणबुड्यांपैकी दुसरी पाणबुडी यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानला सुपूर्द करण्यात आली होती.
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते देवदत्त नागे यांनी जेजुरीमध्ये स्वत:चे घर बांधण्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'जय मल्हार' फेम देवदत्त यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे भूमिपूजन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या बहिणी व भावोजी यांच्या हस्ते पूजन झाले. या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देवदत्त यांनी मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, ज्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सूनबाईंच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
अभिनेता आर. माधवन अलीकडेच 'आप जैसा कोई' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत करिअर, रिलेशनशिपमधील समानता आणि वाढतं वय याबद्दल मत मांडलं. तरुण अभिनेत्रींसह काम करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, असं तो म्हणाला. वय वाढल्यामुळे २२ वर्षांच्या मुलाप्रमाणे कामं करता येत नाहीत, हेही त्याने मान्य केलं.
अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शशांकने भारतात लॉंच झालेल्या टेस्ला गाडीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रस्त्यांवरील खड्ड्यांवरून टेस्ला जात असल्याचे दाखवले आहे. शशांक नेहमीच त्याच्या परिसरातील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. सध्या तो 'मुरांबा' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
स्वानंदी टिकेकर मराठी अभिनेत्री आणि गायक आशीष कुलकर्णी यांची प्रेमकहाणी 'अनुरूप' विवाह संस्थेला दिलेल्या मुलाखतीत उलगडली. रोहित राऊत व जुईली जोगळेकरमुळे पहिल्यांदा भेटलेल्या या जोडप्याने डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केले. पहिल्या भेटीनंतर तीन दिवसांत आशीषने स्वानंदीला लग्नाची मागणी केली. दोघेही गायन आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.
लपून-छपून केलेला एखाद्या गुन्हेगाराचा पाठलाग, डोळ्यावर काळा गॉगल, अंगावर कोट… कुठल्याही रहस्य कथेतील वाटावे असे हे दृश्य. पण, इथे घडणारी ही कथा काही काल्पनिक नाही, हे रोज घडतंय. साहजिकच ही कथा एका गुप्तहेराची आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. परंतु, या कथेतील गुप्तहेर साधासुधा नाही. तर ही कथा भारताच्या आधुनिक इतिहासातील पहिल्या स्त्री गुप्तहेराची आहे.
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊत म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी उत्तर द्यायला हवे होते. धनखड अद्याप उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आहेत, पण माध्यमांसमोर आलेले नाहीत.
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना विभाजनाच्या काळात भारताऐवजी पाकिस्तानची निवड करणारे प्रख्यात दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल यांची कथा हृदय पिळवटून टाकणारी आणि तुलनेने कमी परिचित आहे. भारतातील सामाजिक व्यवस्थेबद्दल भ्रमनिरास झाल्याने आणि सुरुवातीला मोहम्मद अली जिना यांच्या आश्वासनांकडे आकृष्ट होऊन मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री झाले. परंतु, पाकिस्तानच्या बाबतीत धार्मिक पारडं जड ठरल्याने त्यांची अपेक्षा लवकरचं फोल ठरली आणि अखेरीस त्यांना भारतात परत यावे लागले.
सैफ अली खान आणि करीना कपूर संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातून वगळल्यामुळे नाराज होते. सैफने सांगितले की, पैशांबाबत मतभेदांमुळे त्याला चित्रपटातून काढण्यात आले. करीना कपूरनेही 'देवदास'साठी स्क्रीन टेस्ट दिली होती, परंतु ऐश्वर्या रायची निवड झाल्यामुळे ती नाराज झाली. त्यामुळे तिने ठरवले की, भविष्यात संजय लीला भन्साळींसोबत काम करणार नाही.
प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी आज सकाळी गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी दोन डझन गोळ्या झाडल्या, परंतु कुणीही जखमी झाले नाही. एल्विश यादव यावेळी घरात उपस्थित नव्हता.
एक व्यंगचित्र १९२५ साली अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार रॉबर्ट बॉब माइनर यांनी काढले होते. हे व्यंगचित्र आता viral झाले असून त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून भारत आणि चीन भविष्यात महासत्ता ठरू शकतात, असं सूचित केलं गेलं होतं. आज, ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफवाढीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे त्या व्यंगचित्राचा संदर्भ पुन्हा जिवंत झाला आहे.
भारत-अमेरिका व्यापार चर्चा थांबली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीत अमेरिकेच्या दौऱ्यात व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पाच फेऱ्या झाल्यानंतर सहावी फेरी ऑगस्टमध्ये होणार होती, परंतु अमेरिकेने दौरा थांबवला आहे.
अमीर खानने सितारे जमीनपर हा सिनेमा गुगलच्या मालकीच्या यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे. सितारे जमीनपर हा चित्रपट १ ऑगस्टपासून यूट्यूबवर १०० रुपये शुल्क भरून पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शिवाय १५ ते १७ ऑगस्टदरम्यान हे शुल्क स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अर्धेच आकरण्यात येणार आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी खास ओळखले जाणारे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असताना अमीर खानने युट्यूबचा पर्याय का निवडावा, या मागचा व्यावसायिक हेतू काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
दहीहंडी आणि श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी 'शुभमंगल सावधान' सिनेमातील 'कान्हा' गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. वल्लरी आणि आलापिनी या सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असतात.
स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. मालिकेत अमृता (रेवती लेले) या नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे, जी यशची बालमैत्रीण आहे. यश आणि कावेरीची लव्हस्टोरी सुरू होणार होती, पण अमृताच्या येण्याने ती थांबली. माँने यश-अमृताच्या लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे कावेरी घर सोडणार होती, पण चिकूवर आलेल्या संकटामुळे ती थांबली. माँने कावेरीकडून यश-अमृताच्या लग्नाचं वचन घेतलं आहे.
आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जे दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे, एक लहान आतडे आणि दुसरे मोठे आतडे. लहान आतडे अन्न पचवण्याचे आणि पोषक तत्वे शोषण्याचे काम करते, तर मोठे आतडे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेते आणि विष्ठा साठवते. शरीरासाठी पोषण, ऊर्जा आणि एकंदर आरोग्य राखण्यात आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात. आतडे स्वच्छ ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.
Chanakya Niti For Life : प्रत्येकाला आयुष्यात विविध संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत योग्य विचारसरणी असणे आणि योग्य रणनीती अवलंबणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- हाच संकटाचा काळ तुम्हाला कोण तुमचं आणि कोण परकं हे दाखवून देतो. दरम्यान आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि राजकीय कौशल्यासाठी ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या संकटाच्या वेळी तुमचे रक्षण करू शकतात.
मराठी गायिका शाल्मली खोलगडेने स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने भारताची आठवण येत असल्याची भावना व्यक्त केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'जयोस्तुते' गाण्याचे कडवे गायले. शाल्मलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. शाल्मलीने 'इश्कजादे' चित्रपटातील 'परेशान' गाण्याने प्रसिद्धी मिळवली आणि अनेक हिट गाणी गायली आहेत.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकीय इतिहासावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये २०५० सालातील एक कुटुंब, हिंदू-मुस्लिम तणाव, जिन्ना-गांधी मतभेद, देशाची फाळणी आणि हिंसाचार दाखवण्यात आला आहे. चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर यांसारखे कलाकार आहेत.
Does Watching Reels Affect Your Brain Like Alcohol : आजकाल सोशल मीडियावर रील्स पाहण्याचा ट्रेंड सर्व वयोगटांतील लोकांमध्ये झपाट्यानं वाढतोय. तासन् तास ते रील्स पाहण्यात अन् शेअर करण्यात घालवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते रील्स पाहण्यात अधिक वेळ घालवतात. काही सेकंदांच्या या रील्सचे व्हिडीओ पाहण्यास कमी वेळ लागतो; पण त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.
सांगलीत प्रा. एन. डी. पाटील यांच्या नावाने संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अजित पवारांनी एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला.
'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री कशिश कपूरवर एका डिझायनरने फसवणुकीचा आरोप केला आहे. डिझायनर स्मिता श्रीनिवास यांच्या मते, कशिशने ८५,००० रुपयांचा ड्रेस खराब अवस्थेत परत केला आणि भरपाई न देता ब्लॉक केले. डिझायनरने सोशल मीडियावर पुरावे शेअर केले आहेत. या अनुभवामुळे डिझायनरने इतरांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा अधिक कडक करावी यासाठी सुदर्शन मोहिमेची आखणी करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. परंतु, हा संदर्भ देताना मोदींनी महाभारताचा उल्लेख केला आणि श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र कसं वापरलं हेही सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी महाभारतातील नेमका कोणता संदर्भ दिला हे जाणून घेणं नक्कीचं माहितीपूर्ण ठरणारं आहे.
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशातील त्यांच्या घरी मराठी इंडस्ट्रीमधील अनेक तारेतारकांना आमंत्रित केले होते. त्यांनी सर्व पाहुण्यांचं प्रेमाने आदरातिथ्य केलं आणि स्वत:च्या शेतीची सफर घडवली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर अश्विनीच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. या पार्टीत डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी यांसारखे कलाकार उपस्थित होते.