वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण संपलं! आकाशात दिसला ‘ब्लड मून’, पुढचं चंद्रग्रहण कधी?
Chandra Grahan 2025: साल २०२५ मधील शेवटचं चंद्रग्रहण रविवारी रात्री लोकांसाठी एक खास खगोलीय दृश्य ठरलं. संध्याकाळ होताच लोकांचे डोळे आकाशावर खिळले. रात्री ९:५८ वाजता चंद्रावर सावली पडताच लोकांचा उत्साह वाढला. साधारण ३ तास २८ मिनिटं २ सेकंद चाललेलं हे अप्रतिम दृश्य सगळ्यांना मोहून टाकणारं होतं.