धनत्रयोदशीला ‘या’ चूका करू नका! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान; त्रास सहन करावा लागू शकतो…
Dhanteras Buying Tips: धनत्रयोदशी हा सण दरवर्षी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की या दिवशी नवी वस्तू खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन वाढते. पण ज्योतिष शास्त्रानुसार काही वस्तू अशा असतात की त्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास शनीदेव नाराज होतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. म्हणूनच पाहूया अशा ५ वस्तू कोणत्या आहेत ज्या या दिवशी खरेदी करू नयेत.