धनत्रयोदशीला डबल राजयोग! ‘या’ राशींच्या घरी लक्ष्मी येणार सोन पावलांनी, तिजोरीत पैसाच पैसा
Dhanteras Horoscope: धनत्रयोदशीला ग्रहांचा अतिशय सुंदर आणि शुभ संयोग तयार झाला आहे. या धनत्रयोदशीला हंस राजयोग, बुधादित्य राजयोग आणि ब्रह्म योग असा अत्यंत मंगल योग बनला आहे. खरं तर गुरु ग्रहाचं गोचर त्याच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत होत आहे, ज्यामुळे हंस राजयोग तयार झाला आहे. त्याच वेळी बुध आणि सूर्य हे दोघेही कन्या राशीत एकत्र आल्यामुळे बुधादित्य राजयोग प्रभावशाली झाला आहे.