२०२५ संपायच्या आधीच गजकेसरी राजयोग ‘या’ राशींसाठी उघडणार पैशांचा खजिना! बॅंक बॅलन्स वाढेल
Gajkesari Rajyog: लवकरच गुरु आणि चंद्र यांची युती होणार आहे, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. या युतीमुळे अतिशय शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. चला तर मग पाहूया, या राजयोगाचा फायदा कोणत्या ३ राशींना होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे ०२:२४ वाजता चंद्र आपल्या राशीचा बदल करून वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सध्या मिथुन राशीतच देवगुरु गोचर करत आहेत. त्यामुळे मिथुन राशीत गुरु-चंद्र युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होत आहे.