दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा! धन-संपत्तीत वाढ अन् होईल घराची भरभराट
18 October Guru Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि वैभव यांचा कारक मानला जातो. साधारणपणे गुरु एका वर्षात एकदा राशी बदलतो. पण २०२५ साली एप्रिल महिन्यात गुरु मिथुन राशीत आला होता आणि सध्या तो अतिचारी म्हणजेच वेगाने चालत आहे.
पुढील आठ वर्षे गुरु अशीच अतिचारी चाल करणार आहे. या कारणामुळे ऑक्टोबर महिन्यात गुरु आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुचं कर्क राशीत गोचर १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी होईल आणि तो ४ डिसेंबरपर्यंत कर्क राशीत राहील.