‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात खूप हुशार! आयुष्यात मिळतो भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Numerology Predictions: वैदिक ज्योतिषात शुक्र ग्रहाला ऐश्वर्य, धन, सुखसोयी, प्रसिद्धी, कामुकता आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते. शुक्र ग्रहाचा संबंध ६ या अंकाशी मानला जातो. महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. असे लोक नशिबवान असतात. हे लोक लहान वयातच पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि सन्मान मिळवतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक हलकी आणि आकर्षक स्मितरेषा असते. ते दूरदृष्टीचे आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. चला, तर मग जाणून घेऊया अंक ६ असलेल्या लोकांच्या गुणधर्मांविषयी.