‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना सासरकडून मिळते भरपूर संपत्ती! पण रागमुळे तुटू शकतात नाती
Numerology Predictions: मंगळ ग्रह उष्ण आणि अग्नि तत्वाचा देव मानला जातो. अंकशास्त्रानुसार मंगळ हा मूलांक ९ चा स्वामी आहे. या मूलांकाचे लोक खूप धैर्यवान, ऊर्जावान आणि ताकदवान शरीराचे असतात. चला, तर मग मूलांक ९ असणाऱ्या लोकांच्या स्वभावाच्या खास गोष्टी जाणून घेऊया. अंकज्योतिषानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ९ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि त्याचा प्रभाव त्यांच्या स्वभावात स्पष्ट दिसतो. मूलांक ९ असणारे लोक खूप उत्साही, धाडसी आणि सक्रिय स्वभावाचे असतात.