राहूच्या महादशेने ‘या’ राशींच्या नशिबी अफाट संपत्ती! १८ वर्षे प्रभाव टिकत होतील श्रीमंत
Rahu Mahadasha Effects: वैदिक ज्योतिषानुसार राहू ग्रह कठोर बोलणे, जुगार, प्रवास, चोरी, वाईट कृत्य, त्वचेचे आजार, धार्मिक प्रवास यांचा कारक मानला जातो. राहू ग्रह सुमारे १८ महिन्यांनी आपली चाल बदलतो आणि तो नेहमी उलट (वक्री) चालतो.
राहूच्या महादशेचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर कसा होईल, हे त्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती कशी आहे यावर अवलंबून असते. जर राहू ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर चांगले परिणाम मिळतात. पण जर राहू ग्रह वाईट स्थितीत असेल, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.