८ तासानंतर शनीच्या कृपेने या राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२६ पर्यंत तिजोरीत पैशांची वाढ…
Shani Gochar Benefits: वैदिक ज्योतिषात शनीला सर्वात शक्तिशाली आणि कडक ग्रह मानलं जातं. शनी आपल्या कर्मानुसार माणसाला फळ देतो. शनी न्याय, नियम, शारीरिक त्रास, रोग, आयुष्य, दुःख, सुस्ती, मेहनत, नोकर, लोह, तेल, खनिज, धैर्य यांसारख्या गोष्टींचा कारक आहे. शनी हा एकमेव ग्रह आहे ज्याला साडेसाती आणि ढैय्याचा अधिकार आहे. त्यामुळे शनीच्या स्थितीत बदल झाल्यास अनेक क्षेत्रांवर परिणाम होतो आणि काही लोकांना साडेसाती किंवा ढैय्याचा सामना करावा लागतो. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो.