२८ जुलैपासून ‘या’ ४ राशींचा वाईट काळ सुरू! कामांमध्ये वारंवार अपयश तर आर्थिक नुकसान…
Shani Mangal Samsaptak Yog: क्रूर ग्रह शनी आणि मंगळ लवकरच एक धोकादायक योग बनवणार आहेत. २८ जुलैला मंगळाच्या गोचरामुळे हा संयोग तयार होईल आणि त्याचा ४ राशींना मोठा त्रास होऊ शकतो.
ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतो आणि इतर ग्रहांसोबत मिळून शुभ-अशुभ योग तयार करतो. अग्नी तत्त्वाचा ग्रह मंगळ २८ जुलैला गोचर करून कन्या राशीत जाणार आहे. सध्या शनी मीन राशीत आहे. मंगळाच्या गोचरामुळे शनी आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या स्थानी असतील आणि त्यामुळे समसप्तक योग तयार होईल.