१२ महिन्यानंतर अखेर या राशींचा सुवर्णकाळ! शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे बँक बॅलन्समध्ये भर
Shukra Surya Yuti: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह काही काळाने आपली जागा बदलतात आणि दुसऱ्या ग्रहांसोबत एकत्र येतात. याचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि पृथ्वीवर होतो. प्रतिष्ठा देणारा सूर्य आणि वैभव देणारा शुक्र यांचा एकत्र येण्याचा योग येत आहे. सप्टेंबरमध्ये हे दोन्ही ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो आणि त्यांचे नशीब उजळू शकते.