सप्टेंबर महिन्यात या राशींच्या आयुष्यात मोठी उलाढाल! शुक्रादित्य राजयोगामुळे अचानक धनलाभ
September Horoscope: ज्योतिषशास्त्रात सूर्यदेव यांना आत्मविश्वास, मान-सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि वडिलांचे कारक मानले जाते. तर शुक्र ग्रह हा ऐशोआराम, पैसा, वैभव, कामुकता, वैवाहिक सुख आणि श्रीमंतीचा कारक मानला जातो. असे असताना जेव्हा या दोन्ही ग्रहांचा संयोग होतो, तेव्हा या गोष्टींवर विशेष परिणाम दिसतो.
सप्टेंबर महिन्यात शुक्र आणि सूर्य युती तूळ राशीत होत आहे. त्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते.