२४ तासांनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरू! पंचांक योगाने घरी येईल पैसाच पैसा
Surya Yam Panchak Yog: वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह काही काळानंतर राशी बदलतो आणि त्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर काही ना काही प्रकारे दिसून येतो. ग्रहांमध्ये सूर्याला राजा मानले जाते. सूर्य साधारणपणे एका राशीत सुमारे एक महिना राहतो, त्यामुळे त्याला पुन्हा त्या राशीत यायला जवळजवळ एक वर्ष लागते. सध्या सूर्य तूळ राशीत आहे. त्यामुळे तो इतर ग्रहांसोबत संयोग करून शुभ-अशुभ योग निर्माण करतो.