आज दुपारनंतर ‘या’ ३ राशींचा शुभ काळ सुरू! अर्धकेंद्र योगामुळे पैसा अन् मेहनतीच मिळेल यश
Today Horoscope Ardhakendra Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली जागा बदलतो. याचा परिणाम देश-विदेशात दिसतो. सध्या देवगुरु मिथुन राशीत आहेत. या राशीत राहून ते इतर ग्रहांशी युती करतात किंवा दृष्टी टाकतात, ज्यामुळे काही खास योग तयार होतात. आज बृहस्पति आणि बुध एकत्र येऊन अर्धकेंद्र योग करत आहेत. या योगामुळे काही राशींच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. हे विश्लेषण चंद्रराशीवर आधारित आहे, पण लग्न राशीवरूनही पाहू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल.