“तुम्ही मला वडिलांसारखे…”, बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची अनुराग कश्यपसाठी भावुक पोस्ट
अनुराग कश्यपच्या आगामी 'नीशांची' चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनुरागच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्यने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. अनुरागने दिलेल्या संधीबद्दल त्याने आभार मानले आणि त्याला मार्गदर्शक, शिक्षक, मित्र आणि वडिलांसारखा मानले. 'नीशांची' चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.