“त्याच्याबद्दलचे सर्व निर्णय…”, फैजल खानच्या आरोपांवर आमिर खानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा भाऊ फैजल खानने आमिर व कुटुंबीयांवर वर्षभर कोंडून ठेवल्याचे आरोप केले होते. खान कुटुंबीयांनी हे आरोप नाकारले असून, फैजलच्या मानसिक आरोग्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी माध्यमांना चुकीच्या अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे. आमिर सध्या 'महाभारत' प्रोजेक्टसह इतर चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे.