“९ आठवड्यांची गरोदर असताना गर्भपात झाला”, बॉलीवूड अभिनेत्रीने गमावलेलं पहिलं बाळ
अभिनेत्री गौहर खानने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. गौहर आणि तिचा पती झैद दरबार लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. गौहरने नुकताच तिचा यूट्यूब पॉडकास्ट 'मानोरंजन' लाँच केला आहे, ज्यात ती मातृत्व आणि गर्भधारणा याबद्दल बोलते. पहिल्या भागात, गौहरने तिच्या गर्भपाताबद्दल सांगितलं आणि ती भावुक झाली. गौहर आणि झैदने डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं.