“अभिनेत्यांना नेहमी चांगल्या सोयी मिळतात, पण…”, बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने स्त्री-पुरुष समानतेबद्दल तिचे अनुभव सांगितले आहेत. तिने म्हटले की, पुरुष कलाकारांना हिट चित्रपटानंतर अनेक संधी मिळतात, पण स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. तिने पुरुष सहकलाकारांच्या तुलनेत कमी सोई-सुविधा मिळाल्याचेही नमूद केले. सुरुवातीला इकॉनॉमिक क्लासने प्रवास करणारी नुसरत आता बिझनेस क्लासने प्रवास करते. दोन वर्षे काम नसल्याचा अनुभवही तिने शेअर केला.