“आय लव्ह यू…”, ‘सैयारा’ पाहिल्यानंतर अहान पांडेच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट; म्हणाली…
अहान पांडेच्या पदार्पणातील 'सैयारा' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी चित्रपटाचं आणि अहानच्या कामाचं कौतुक केलं आहे. अहानची कथित गर्लफ्रेंड श्रुती चौहान हिनंही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याचं कौतुक केलं आहे. तिनं अहानच्या मेहनतीचं आणि स्वप्नपूर्तीचं कौतुक करताना त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रुती चौहान ही बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल आहे.