आलिया भट्ट व रणबीर कपूर करणार नवीन घरात प्रवेश, सहा मजली आलिशान बंगल्याचं काम पूर्ण
बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या आलिशान बंगल्याचं काम पूर्ण झालं आहे. २५० कोटींच्या या सहा मजली बंगल्यात गार्डन, बाल्कनी आणि प्रत्येक मजल्यावर झाडे आहेत. १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न झाल्यानंतर त्यांच्या मुलीचा जन्म झाला. आता ही जोडी लवकरच गृहप्रवेश करणार आहे.