ऐश्वर्या रायच्या हॉलीवूडमधील करिअरबाबत अमिताभ बच्चन यांनी दिलेली ‘ही’ प्रतिक्रिया
प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातील पहिल्या सीझनमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या एपिसोडमध्ये ऐश्वर्या राय व संजय लीला भन्साळी उपस्थित होते. करणने ऐश्वर्याच्या हॉलीवूड करिअरबद्दल विचारले असता, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, सुश्मिता सेन यांसारख्या कलाकारांनी आपली मतं व्यक्त केली. अमिताभ बच्चन म्हणाले, "ती एका टप्प्यापर्यंत जाईल, पण त्यापुढे नाही." ऐश्वर्याने २००४ साली 'ब्राइड अँड प्रीजुडाइस'मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.