“पूर्वी सहज जमणाऱ्या गोष्टींसाठी आता…”, अमिताभ बच्चन यांना वाढत्या वयामुळे होतोय त्रास;
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये वय वाढल्यामुळे येणाऱ्या शारीरिक समस्यांबद्दल सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आता दैनंदिन दिनचर्या औषधं घेणं, प्राणायाम, योगासनं आणि हलकीफुलकी हालचाल यामध्ये अडकली आहे. साध्या गोष्टी जसं की पँट घालणं, कागद उचलणं यासाठीही आधाराची गरज भासते. त्यांनी म्हटलं की, वय वाढल्यावर आयुष्याला स्पीडब्रेकर लागतो आणि शेवटी आपण सगळे हरतो, हे जीवनाचं कटू सत्य आहे.