“लाज वाटायला हवी…”, अनुराग कश्यपची पोस्ट; AI च्या साह्याने चित्रपट बनवणाऱ्यांवर केली टीका
लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक विजय सुब्रह्मण्यम यांच्यावर टीका केली आहे. विजय यांनी 'चिरंजीवी हनुमान' हा एआयच्या साह्याने बनवलेला चित्रपट जाहीर केला होता. अनुरागने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत म्हटले की, कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे विजय आता एआयद्वारे चित्रपट बनवत आहेत. कलाकारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित करावा किंवा संस्था सोडावी, असेही अनुरागने म्हटले.