‘मिस्टर इंडिया’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार होता मोगॅम्बो, अचानक पत्ता कट झाला अन्…
१९८७ मध्ये आलेला 'मिस्टर इंडिया' चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या भूमिकांनी हा चित्रपट गाजला. मोगॅम्बोची भूमिका आधी अनुपम खेर यांना देण्यात आली होती, पण नंतर अमरीश पुरी यांना घेतलं. अनुपम खेर यांनी याबद्दल मत्सर वाटल्याचं सांगितलं, पण नंतर अमरीश पुरी यांच्या कामाचं कौतुक केलं.