संजय दत्तच्या नावावर चाहतीने केलेले तब्बल ७२ कोटी रुपये, अभिनेत्याने त्या पैशाचं काय केलं?
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला २०१८ मध्ये एका महिला चाहतीने तिची ७२ कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या नावावर केल्याची माहिती मिळाली. संजय दत्तने या संपत्तीबद्दल खुलासा करताना सांगितले की, त्याने ती संपत्ती परत तिच्या कुटुंबाला दिली. सध्या संजय दत्त 'अखंड २', 'धुरंधर', 'द राजासाहेब' आणि कन्नड चित्रपट 'केडी – द डेव्हिल'मध्ये व्यग्र आहे.