संस्कार की दिखावा? कन्या पूजनच्या फोटोमुळे वरुण धवन ट्रोल, ‘त्या’ कृतीवर चाहते नाराज
बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या घरी कन्यापूजन केले. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले ज्यात तो शाळकरी मुलींसह जेवताना दिसतो. मात्र, मुलींना टाकाऊ पत्रावळ्या आणि स्वतःला स्टीलच्या ताटात जेवण दिल्यामुळे तो ट्रोल झाला. काहींनी त्याच्या साधेपणाचे कौतुक केले, तर काहींनी टीका केली. वरुणचा नवीन सिनेमा "Sunny Sanskari Ki Tulsi Kumari" नुकताच प्रदर्शित झाला आहे.