“तुमचे पाय दाखवू नका”, नीना गुप्तांच्या व्हिडीओवर महिलेची कमेंट, उत्तर देत म्हणाल्या…
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्वभावामुळे चर्चेत असतात. नुकतंच एका महिलेनं त्यांना वयावरून ट्रोल केलं. नीना गुप्तांनी संयमी उत्तर देत, "जे लोक असं बोलतात, कारण त्यांना चांगलं शरीर नसल्याचा मत्सर वाटतो," असं म्हटलं. त्यांच्या या उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं. नीना गुप्ता अलीकडेच 'मेट्रो... इन दिनो' चित्रपटात झळकल्या होत्या.