शाहरुख खान अन् अमिताभ बच्चन यांच्यासह पदार्पण; तरी काम नाही, अभिनेत्रीने सांगितला अनुभव
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने २००० साली 'मोहब्बते' चित्रपटातून पदार्पण केलं, पण तिला फार कमी सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या. अनेक सिनेमे पूर्ण होऊनही प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे शमिताने इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आणि स्वतःची कंपनी सुरू केली. तिने सांगितलं की, जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते आणि तिला मिळालेल्या संधींसाठी ती आभारी आहे.