प्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, दु:ख व्यक्त करत म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तनिष्ठा चॅटर्जीला स्तनाचा कर्करोग झाला आहे. चार महिन्यांपूर्वी तिला स्टेज IV ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. वडिलांच्या निधनानंतर ती या दु:खातून सावरत होती. अशातच तिला कर्करोगबद्दल कळलं. यानंतर तनिष्ठाने तिच्या मुलीला अमेरिकेत पाठवले आहे. योग आणि अध्यात्माच्या मदतीने ती या आजाराचा सामना करत तसंच तिला डॉक्टरांनी लवकरच बरी होण्याची आशा दिली असल्याचं सांगितलं.