प्रसिद्ध अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करतेय डेट?
अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या भावाला, वीर पहारियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तारा आणि वीर यांना एकत्र रेस्टॉरंटबाहेर आणि लॅक्मे फॅशन वीकमध्ये पाहिलं गेलं. तारा पूर्वी आदर जैनला डेट करत होती, ज्याचं २०२३ मध्ये ब्रेकअप झालं. वीर पहारिया हा जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.