‘मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचं वादावर अखेर स्पष्टीकरण
बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनी वरण-भात गरिबांचं जेवण म्हटल्याने टीका झाली. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की, हे वक्तव्य मजामस्करीत केलं होतं. पुढे त्यांनी मराठी जेवण आरोग्यदायी असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. विवेक लवकरच 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येणार आहेत.