“गांधींचं कोणी ऐकत नव्हतं”, विवेक अग्निहोत्रींचं वक्तव्य; म्हणाले, “काँग्रेसने त्यांना…”
बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द बंगाल फाइल्स' हा नवा सिनेमा घेऊन येत आहेत, जो ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात फाळणीनंतर बंगालमध्ये काय घडलं याची कथा आहे. महात्मा गांधींच्या भूमिकेत अनुपम खेर आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर गांधीजींचं कोणी ऐकत नव्हतं आणि काँग्रेसने त्यांना बाजूला केलं होतं. विभाजनाचा निर्णय आठ लोकांनी घेतला होता.