श्रेया घोषालने गर्भवती चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण, गायिकेचं होतंय कौतुक, पाहा व्हिडीओ
श्रेया घोषाल ही लोकप्रिय गायिका असून तिने हिंदीसह मराठी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अॅमस्टरडॅममध्ये असताना, एका गरोदर चाहतीच्या विनंतीवरून तिने 'पियू बोले' हे गाणं तिच्या पोटातील बाळासाठी गायले. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.