दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टसह केलेल्या ‘या’ मागण्या; ‘स्पिरीट’ वादाचं कारण समोर
चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरीट' चित्रपटातून दीपिका पादुकोणने एक्झिट घेतली आहे. तिने फक्त आठ तास काम करण्यासह काही अटी ठेवल्या होत्या, ज्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर दीपिकाने चित्रपट सोडला. 'स्पिरीट'मधून बाहेर पडण्याबद्दल एक नवी चर्चा होताना दिसत आहे, ती म्हणजे दीपिकाने २५ कोटी रुपये आणि १० टक्के नफ्याचा वाटा मागितला. त्यामुळे हा वाद वाढला.