२० दिवस शूटिंग करूनही दीपिका पादुकोणला ‘कल्की २८९८ ए.डी.’मधून का काढलं? नेमकं कारण समोर
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'कल्की २८९८ ए.डी.' चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने या चित्रपटाचे काही भाग आधीच शूट केले होते, परंतु मानधन वाढीच्या मागणीमुळे ती चित्रपटातून बाहेर पडली. दीपिकाने लगेचच तिचा पुढचा प्रोजेक्ट 'किंग' जाहीर केला, ज्यात ती शाहरुख खानसोबत काम करणार आहे. 'किंग' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत आणि हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.