“माझ्याशी लग्न करशील का?” म्हणत दीपिका पादुकोणने सलमान खानला केलेलं प्रपोज
दीपिका पादुकोण आणि सलमान खान हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत, परंतु त्यांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. 'बिग बॉस'च्या ९व्या सीझनमध्ये दीपिका तिच्या 'तमाशा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने सलमानला गमतीत प्रपोज केलं होते. दीपिकाने गुडघ्यावर बसून सलमानला "विल यू मॅरी मी मिस्टर सलमान खान" असे विचारले होते. सलमानने हसत हे होऊ शकत नाही असे उत्तर दिले.