धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत हळूहळू होतेय सुधारणा, देओल कुटुंबीय साजरा करणार ९० वा वाढदिवस
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत आहेत. वाढत्या वयामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि आता घरीच उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून देओल कुटुंबीय त्यांच्या ९० व्या वाढदिवसाची तयारी करत आहेत. धर्मेंद्र आणि ईशा देओलचे वाढदिवस एकत्र साजरे करण्याची शक्यता आहे.