ईशा देओल आणि भरत तख्तानी घटस्फोटाच्या वर्षभरानं पुन्हा एकत्र, एक्स पतीसाठी खास पोस्ट
बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी विभक्त झाल्यानंतरही मुलांचा एकत्र सांभाळ करीत आहेत. भरतच्या वाढदिवसानिमित्त ईशाने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ईशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर भरतचा हसरा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी त्यांच्या एकत्र येण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ईशा आणि भरतचा विवाह २०१२ मध्ये झाला होता आणि २०२४ मध्ये ते विभक्त झाले.