“साजिद खानने मला शिवी दिली होती”, ईशा गुप्ताने सांगितला भांडणाचा ‘तो’ प्रसंग; म्हणाली…
अभिनेत्री नवीना बोलेने दिग्दर्शक साजिद खानवर ऑडिशनच्या बहाण्याने कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेत्री ईशा गुप्ताने 'हमशकल्स' चित्रपटादरम्यान साजिदने तिला शिवी दिल्याचं सांगितलं आहे. या वादानंतर साजिदने माफी मागितल्याने तिने चित्रपटात काम केलं. तसंच ईशाने सांगितलं की, तिच्याबरोबर कधीही MeToo ची घटना घडली नाही.